Home > रिपोर्ट > उत्तर महाराष्ट्रात भाजपकडून तीन महिला उमेदवारांना संधी

उत्तर महाराष्ट्रात भाजपकडून तीन महिला उमेदवारांना संधी

उत्तर महाराष्ट्रात भाजपकडून तीन महिला उमेदवारांना संधी
X

भाजपनं पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्रात तीन महिला उमेदवारांना संधी दिली आहे. यात जळगाव लोकसभा मतदारसंघातून विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे आणि नंदुरबारमधून डॉ. हिना गावित यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

जळगावचे विद्यमान भाजप खासदार एटी नाना पाटील यांना उमेदवारी नाकारून भाजपनं विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलीय. २०१४ मध्ये विक्रमी मतांनी निवडून आलेल्या पाटील यांना कथित व्हिडिओ क्लिपमुळं उमेदवारी नाकारण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

कोण आहेत स्मिता वाघ ?

स्मिता वाघ या भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आहेत. शिवाय त्या विधानपरिषदेच्या आमदारही आहेत. स्मिता यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. एकनाथ खडसे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर वाघ दांपत्यांनी गिरीष महाजन यांच्याशी जुळवून घेतलेलं आहे.

जळगावसाठी महाजनांचा कस लागणार ?

उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या आठही जागा निवडून आणण्याची जबाबदारी ही जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावरच आहे. मात्र, त्यांना जळगाव या आपल्या होमटाऊनवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठा कस लागणार आहे. भाजपच्या स्मिता वाघ आणि राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्यात सध्या थेट लढत दिसत आहे.

दोघा उमेदवारांचं वास्तव्य हे जळगावला असल्यानं पहिल्यांदा या दोघातील निवडून आलेला खासदार सर्वाधिक मतदार असलेल्या जळगावकरांना मिळणार आहे.

खान्देशात चार मतदार संघ येतात. यातील तीन मतदार संघात भाजपनं तीन महिला उमेदवारांना संधी दिलीय हे विशेष. जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच दोघा मतदार संघात महिलांना संधी मिळाली आहे.

रावरे - रक्षा खडसे (भाजप विद्यमान खासदार)

नंदुरबार- डॉ हिना गावीत (भाजप विद्यमान खासदार)

यांना उमेदवारी दिलीय.

Updated : 23 March 2019 11:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top