Home > रिपोर्ट > खा. सुप्रिया सुळेंचा विचित्र अनुभव... असं काय घडले दादर रेल्वे स्टेशनवर?

खा. सुप्रिया सुळेंचा विचित्र अनुभव... असं काय घडले दादर रेल्वे स्टेशनवर?

खा. सुप्रिया सुळेंचा विचित्र अनुभव... असं काय घडले दादर रेल्वे स्टेशनवर?
X

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे दादर रेल्वे स्टेशन वर उतरल्या. त्यानंतर कुलजीत सिंघ मलहोत्रा नावाचा टॅक्सी ड्रायव्हर टॅक्सी सेवेची विचारणा करत होता. त्याला नकार देऊनही तो सुप्रिया सुळे यांचा रस्ता आडवत होता. या प्रकरणाची त्यांनी रेल्वे पोलीसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी त्याला अटक करून दंड देखील ठोठावला.

कायद्यानुसार विमानस्थानक तसेच रेल्वेस्थानकावर कोणत्याही टॅक्सी चालकाला येण्यास परवानगी नाही. त्यांनी केवळ नेमून दिलेल्या टॅक्सी स्टॅंडवरच राहून, टॅक्सी सेवेची विचारणा करावी. असा नियम आहे. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी या बाबींवर विशेष लक्ष देऊन यावर कारवाई करण्याचं आश्वासन सुप्रिया सुळे यांना दिलं आहे. जेणेकरून इतर प्रवाशांना खास करून महीलांना याचा त्रास होऊ नये.

Updated : 13 Sep 2019 7:55 AM GMT
Next Story
Share it
Top