Home > रिपोर्ट > शरद पवारांची आ. संध्यादेवी कुपेकर यांना अनोखी ऑफर

शरद पवारांची आ. संध्यादेवी कुपेकर यांना अनोखी ऑफर

शरद पवारांची आ. संध्यादेवी कुपेकर यांना अनोखी ऑफर
X

शिवसेना - भाजप च्या झालेल्या युतीनंतर राष्ट्रवादी पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंदगड मतदार संघाच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांना अनोखी ऑफर दिली आहे.

आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी मुंबई मध्ये शरद पावर यांची भेट घेवून यापूढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय पवारांना सांगीतला आहे. त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी निवडणूक न लढण्याचे ठरवलं आहे. यावर शरद पवार यांनी संध्या कुपेकर यांना म्हटले की, “तुम्ही निवडणूक लढवणार नसाल तर दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी, तुमच्या कन्या डॉ. नंदीनी बाभूळकर यांना रिंगणात उतरवा. आम्ही त्यांना उमेदवारी देऊ.” परंतू दुसरीकडे डॉ. नंदीनी बाभूळकर या भाजपा च्या वाटेवर असल्याची चर्चा रंगतेय. त्यामुळे आता नंदीनी बाभूळ चंदगड मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार की? राष्ट्रवादीच्या हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated : 18 Sep 2019 1:26 PM GMT
Next Story
Share it
Top