Home > रिपोर्ट > मनसेच्या शालिनी ठाकरेंनी दिल्या उर्मिला मातोंडकरांना शुभेच्छा

मनसेच्या शालिनी ठाकरेंनी दिल्या उर्मिला मातोंडकरांना शुभेच्छा

मनसेच्या शालिनी ठाकरेंनी दिल्या उर्मिला मातोंडकरांना शुभेच्छा
X

राजकीय पक्ष म्हटलं की एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतच असतात. मात्र, महिला जेव्हा राजकारणात असतात तेव्हा त्याचं स्वरुप काय असु शकतं, याचा प्रत्यय नुकताच आला व त्यासाठी निमित्त ठरल्या मनसेच्या शालिनी ठाकरे. उर्मिला मातोंडकर यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या राजकीय वाटचालीचं शालिनी ठाकरे यांनी स्वागत करत शुभेच्छाही दिल्या आहेत.

अशा दिल्या शालिनी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना शुभेच्छा

सस्नेह जय महाराष्ट्र !

स्वतः तील अंगभूत अभिनयगुणांच्या जोरावर एक अभिनेत्री म्हणून तू स्वतःचा स्वतंत्र ठसा बॉलीवूडवर उमटवलास. अनेक उत्तमोत्तम सिनेमे तुझ्या वाट्याला आले आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं तू सोनं केलंस.

आज काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून तुझं नाव जाहीर केलंय. राजकारणात सक्रिय होण्याचा हा निर्णय निश्चितच संपूर्ण विचारांती घेतला असशील. या निवडणुकीच्या निमित्तानं तुझ्यासारखं एक संवेदनशील व्यक्तिमत्व राजकारणात आल्याचा आम्हांला निश्चितच आनंद आहे.

महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना - समस्यांना आवाज फोडण्यासाठी तुझ्यामुळे मदत होईल, याची खात्री आहे.

तुझ्या या नव्या इनिंगला 'मनसे' शुभेच्छा!

Updated : 30 March 2019 12:03 PM GMT
Next Story
Share it
Top