Home > रिपोर्ट > धक्कादायक... बुलढाण्यात नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक... बुलढाण्यात नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक... बुलढाण्यात नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
X

पुन्हा तिच काळरात्र ठरली... बुलढाण्यातील चिखली येथे नऊ वर्षीच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या कामगाराच्या ९ वर्षीय मुलीला दोन युवकांनी 27 एप्रिलच्या मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान मुलीचे आई, वडील झोपेत असल्याचे पाहून मुलीला तोंड दाबून त्यांच्या स्कुटी वरून पळवून नेले. दरम्यान आपली मुलगी झोपलेल्या जागेवर नसल्याचे पाहून मुलीच्या वडिलांनी चिखली पोलीस स्टेशन गाठून याबाबतची माहिती दिली. यावर पोलीससह मुलीच्या वडीलांनी शोधाशोध केली असता अल्पवयीन मुलगी स्थानिक मौनीबाबा संस्थान जवळल परिसरात आढळून आली. पीडित मुलीला पोलिसांसह वडिलांनी विचारपूस केली असता तिच्या सोबत २ युवकांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समजले. पीडित मुलीच्या गुप्तांगावर अधिक जखमा असल्यामुळे तिला बुलडाणा रुग्णालयातून औरंगाबाद रुग्णालयात हलवणार असल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे. या घटनेमुळे बुलढाणा जिल्हा हादरला असून पोलिसांनी कलम ३६६अ,३७६ डी.बी. तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम ६ नुसार गुन्हा दाखल केलाय. यावेळी सागर बोरकर या आरोपीला अटक केली असून एक आरोपी फरार आहे.. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत असून ग्रामस्थांकडून आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/331461534223899/

Updated : 27 April 2019 4:31 PM GMT
Next Story
Share it
Top