Home > रिपोर्ट > रुपाली पाटील ठोंबरे पक्षावर आक्रमक

रुपाली पाटील ठोंबरे पक्षावर आक्रमक

रुपाली पाटील ठोंबरे पक्षावर आक्रमक
X

महाराष्ट्र नवनिर्मानसेनेने आपली पहिली यादी जाहिर केली आहे. या यादिमध्ये पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून अजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी थेट मुंबई गाठली.

रुपाली पाटील ठोंबरे या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षा, तर पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.तसेच त्या पुणे महापालिकेतील माजी नगरसेविका आहेत. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ठोंबरे इच्छुक होत्या. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.

Updated : 2 Oct 2019 12:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top