Home > रिपोर्ट > राणी मुखर्जीने साधला नाइट पेट्रोल महिला पोलिसांशी संवाद

राणी मुखर्जीने साधला नाइट पेट्रोल महिला पोलिसांशी संवाद

राणी मुखर्जीने साधला नाइट पेट्रोल महिला पोलिसांशी संवाद
X

अभिनेत्री रानी मुखर्जी हिचा अगामी चित्रपट 'मर्दानी 2 (Mardani 2)' हा चित्रपट १३ डिसेंबर ला प्रदर्शित होणार आहे. ती सध्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. यावेळी रानी मुखर्जीने मुंबईमधील रात्री ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसांजवळ बातचीत केली. याचा फोटो तिने ट्विट करून शेअर केला आहे. दिवस रात्र शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस काम करत असतात विशेष नाइट पेट्रोल पोलीस यांना भेटून तिने त्यांचे आभार मानले आहेत. अश्या पोलिसांना राणी मुखर्जी सलाम करते असं तिने म्हटलं आहे. या महिला पोलीस सकाळी ८ ते ८ तास काम करून १२ तास काम करत आहेत. यांचं काम खरंच प्रेरणा देणारे आहे आपण रात्री यांच्यामुळेच शांत झोपू शकतो अश्या शब्दात तिने या नाइट पेट्रोल पोलिसांचे आभार मानले आहेत.

Updated : 7 Dec 2019 6:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top