Home > रिपोर्ट > रक्षाबंधन स्पेशल: सीमेवरील सैनिकांसाठी एक धागा शौर्याचा

रक्षाबंधन स्पेशल: सीमेवरील सैनिकांसाठी एक धागा शौर्याचा

रक्षाबंधन स्पेशल: सीमेवरील सैनिकांसाठी एक धागा शौर्याचा
X

नवी मुंबईतील कामोठे येथील महीलांनी सिमेवरील सैनिकांसाठी नवीन उपक्रम राबवला आहे. दिशा महीला मंचच्या महिलांनी तब्बल एक हजार हाताने बनवलेल्या राख्या पाठवून देशाच्या रक्षण करणार्या सैनिकाप्रती प्रेम व्यक्त केले आहे. एक धागा शौर्याचा, एक धागा रक्षणाचा या उपक्रमांतर्गत कामोठे येथील महिलांनी घरीच राहून जालंधर पंजाब येथील युनिटमध्ये पोस्टाच्या साहाय्याने राख्या पाठविल्या आहेत.

जवानांना सण, उत्सव साजरा करण्यासाठी घरी येता त्यामुळे देशाच्या रक्षण करणार्या सैनिकांसाठी कामोठे येथील दिशा महिला मंचच्या बहिणींनी तब्बल एक हजार राख्या पाठवल्या व शुभेच्छा पत्र पाठवले आहेत. या राखीच्या धाग्याने हजारो सैनिकांनी आमच्या रक्षणासाठी सीमेवर लढताना प्रेरणा मिळावी या उद्देयाने एक धागा शौर्याचा. एक धागा रक्षणाचा हा उपक्रम राबवल्याचा, दिशा महिला मंचच्या अध्यक्षा नीलम आंधळे यांनी सांगितले. यावेळी रेखा ठाकूर, खुशी सावर्डेकर अनुप्रिता महिले, गीताजंली नायकोडी, भावना सरदेसाई, रीना पवार, दीपाली कपाते. सुरेखा आडे. शालू पांडे, अनुजा मस्के ईत्यादी महीलांचा समावेश होता.

https://youtu.be/5kng8wKxnN8

Updated : 3 Aug 2020 2:12 AM GMT
Next Story
Share it
Top