Home > रिपोर्ट > प्रणिती शिंदेंना टेंशन

प्रणिती शिंदेंना टेंशन

प्रणिती शिंदेंना टेंशन
X

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षानं एकमेंकांविरोधात उमेदवारी दिल्यानं सोलापूर जिल्ह्यात दोन मतदारसंघामध्ये ऐन निवडणूकीच्या तोंडावर आघाडीत बिघाडी झाल्यानं जिल्हयातील राजकारण चांगलच रंगात आलं आहे.

आपापसात तालमेल नसणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील पेचामुळे कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे जुबेर बागवान यांचे आव्हान असणार आहे. यामुळे सोलापूरमधील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंढरपूरचे कॉंग्रेस आमदार भरत भालके यांना राष्ट्रवादीने परस्पर उमेदवारी दिल्यानं काँग्रेसनं शिवाजीराव काळुंगे यांना भालकेंविरोधात उभे केले. तर, याला प्रत्यूत्तर म्हणून सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने जुबेर बागवान यांची उमेदवारी दाखल केली आहे.

Updated : 5 Oct 2019 11:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top