Home > रिपोर्ट > उद्धव ठाकरेंची शपथविधी, सुप्रिया सुळेंनी केले 'हे' ट्विट

उद्धव ठाकरेंची शपथविधी, सुप्रिया सुळेंनी केले 'हे' ट्विट

उद्धव ठाकरेंची शपथविधी, सुप्रिया सुळेंनी केले हे ट्विट
X

आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याबरोबरच काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील शपथ घेणार आहेत. या शपथविधीच्या पार्शभूमीवर भला मोठा स्टेज उभारण्यात आला आहे. क्रेनद्वारे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात येणार आहे. १४० बाय ५० फुटाचे व्यासपीठ असणार आहे. आजच्या शपथविधी संदर्भात सुप्रिया सुळेंनी ट्विट केलं आहे, 'आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु. अभिनंदन!' असं ट्विट खासदार सुप्रिया सुळें यांनी केलं आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1199886376084226049?s=20

Updated : 28 Nov 2019 6:22 AM GMT
Next Story
Share it
Top