महिला अत्याचारानंतर भाजपच्या नेत्याचं नाईट लाईफ वर निशाना
Max Woman | 21 Jan 2020 4:34 PM IST
X
X
महाविकास आघाडीतील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या 'नाइट लाइफ'ची चर्चा सध्या जोर धरत आहे.राजकीय वर्तुळात काहीजण याला विरोध करत आहेत तर दुसरीकडे याचं स्वागत देखील केलं जात आहे. या 'नाइट लाइफ'च्या प्रस्तावाला भाजप नेते राज पुरोहित यांनी विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर मुंबईत २४ तास मॉल,आणि पब खुले राहिले तर मद्यसंस्कृती वाढेल आणि त्यामुळं महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल. निर्भयासारख्या हजारो घटना उघडकीस येतील. त्यामुळं अशी संस्कृती भारतासाठी चांगली ठरेल का याचा त्यांनी विचार करायला हवा, असं पुरोहित म्हणाले. येत्या २६ जानेवारीपासून नाइट लाइफचा प्रारंभ होण्याचं बोललं जात आहे. दक्षिण मुंबईतील अनिवासी विभाग या ‘नाइट लाइफ’साठी सुरुवातीला निवडण्यात आले आहेत.
https://twitter.com/KrishuUpadhyay/status/1219453632057233408?s=20
Updated : 21 Jan 2020 4:34 PM IST
Tags: mumbai-nightlife-
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire