Home > रिपोर्ट > ‘ही’ अभिनेत्री करतेय गरजू महिलांना मदत

‘ही’ अभिनेत्री करतेय गरजू महिलांना मदत

‘ही’ अभिनेत्री करतेय गरजू महिलांना मदत
X

यंदाच्या दिवाळीला पर्यावरण पूरक कंदील वापरण्याचं आवाहन अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केलंय. ‘यंदाच्या दिवाळीला विवेकाचा कंदील लावूया आपल्या घरी आणि रोजगाराचा प्रकाश पाडूया आदीवासी महिलांच्या दारी’ असं म्हणत तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

‘विवेक राष्ट्र सेवा समिती’ ही संस्था वनवासी, गरजू आदीवासी महिलांना बांबूपासून कंदील बनवण्याचं प्रशिक्षण देते. प्राजक्ताने अधिकाधिक लोकांना हे कंदील वापरण्याची विनंती केली आहे. जेणेकरून आदीवासी, वनवासी महिलांना एक सन्मानजनक रोजगार उपलब्ध होईल आणि पर्यावरणाचे नुकसान देखील होणार नाही.

Updated : 4 Oct 2019 1:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top