Home > रिपोर्ट > हळदी कुंकू कार्यक्रमाचे नामकरण तिळगूळ समारंभ केल्याने काही फरक पडेल का?

हळदी कुंकू कार्यक्रमाचे नामकरण तिळगूळ समारंभ केल्याने काही फरक पडेल का?

हळदी कुंकू कार्यक्रमाचे नामकरण तिळगूळ समारंभ केल्याने काही फरक पडेल का?
X

मकर संक्रांती म्हटलं की महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे 'हळदी कुंकू'. हळदी कुंकू ही सध्याच्या काळात महिलांसाठी एक प्रथा नसून तो एक सोहळाच बनला आहे. हळदी-कुंकू म्हटलं की विवाहित महिलांना ओटीमध्ये देण्यात येणारे वाण हे फार महत्त्वाचे असते. यानिमित्ताने अमुक तमुक गोष्टी एकमेकांना दिले जातात. मात्र आता हळदी कुंकूचे स्वरूप बदलेले आहे. आताचे हळदी कुंकू हे सामाजिक विषय घेऊन देखील केले जातात. एकमेकींना हळदी-कुंकू लावत सुगडीतील साहित्याची देवाणघेवाण करीत या लेकी एकमेकींना भेटत असतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वत्र पतंग उडवण्याचा कार्यक्रम असतो.

आता थोडं तिळगूळ समारंभ याबद्दल बोलू एरवी सण-समारंभ आणि कार्यक्रमांसाठी काळे कपडे वर्ज्य असतात. पण संक्रांत म्हटलं की तिळगूळ, गूळपोळी, हळदीकुंकू हे सगळं तर आलंच. समोरच्याला तिळगूळ देऊन गोड बोलण्याची पद्दत आणि या सणाचं सांस्कृतिक, धार्मिक महत्त्व आपल्याला माहीत आहेच. संक्रांतीनंतर तिळा तिळाने मोठय़ा होत जाणाऱ्या दिवसामुळे शेतात अधिक काळ काम करायला मिळते, म्हणून हे दिवस आनंदाचे असतात.

हळदी कुंकू आणि तिळगूळ समारंभ यामध्ये हळदी कुंकू कार्यक्रमाचे नामकरण तिळगूळ समारंभ केल्याने काही फरक पडेल असं फेसबुक वोट पोल घेतला असता २८ % लोकांनी "हो" म्हटलं तर ७२% लोकांनी "नाही" असं म्हटलं आहे.

Updated : 19 Jan 2020 1:24 PM IST
Next Story
Share it
Top