Home > रिपोर्ट > तृप्ती देसाई गिरीश महाजनांवर भडकल्या

तृप्ती देसाई गिरीश महाजनांवर भडकल्या

तृप्ती देसाई गिरीश महाजनांवर भडकल्या
X

भाजपा नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुराची पाहणी करताना काढलेल्या सेल्फीत हसून दाद दिल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यानंतर भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सांगली आणि कोल्हापूर मधिल पुराची भीषण स्थिती पाहण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी गिरीश महाजन यांनी सेल्फी काढून नागरिकांची थट्टा केली आहे."निर्लज्जम सदासुखी" आणि " निर्लज्जपणाचा कळस" आहे अशी टीका त्यांनी केली.

याला सांगलीकर,कोल्हापूरकर कधीच माफ करणार नाहीत. मुख्यमंत्री साहेब योग्य वेळ आल्यावर राष्ट्रीय आपत्ती म्हणुन जाहीर करू, असे आपण म्हणालात. आपली जनादेशयात्रा झाली, काहीजणांची जनआशीर्वाद यात्रा झाली ,काहीजणांची शिवस्वराज्य यात्रा झाली पण इथे जनता " मरण यात्रेत" आहे त्यांना पहिले सुरक्षितपणे बाहेर काढणे गरजेचे त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तर अबकी बार 220पार "परंतु आता आपल्या कार्यकर्त्यांना सांगा ना की "अबकी बार पूरग्रस्त नागरिक सुरक्षित पार "म्हणून सगळ्यांना मदतीला तिथे उतरण्याचे आदेश द्या अशा शब्दात तृप्ती देसाई यांनी गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.

https://youtu.be/uKvNrJe3a4Y

Updated : 9 Aug 2019 11:41 AM GMT
Next Story
Share it
Top