Home > रिपोर्ट > सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क
X

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीचे सरकार येईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

मतदान केल्या नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादीने कायम विकासाच्या मुदद्यावर मत मागितले आहे. त्यामुळे विजयाची खात्री आहे. तसेच यावेळी पावसाची तमा न बाळगता लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

आज राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी आणि सातारा लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूकीसाठी मतदान होत आहे.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष मिळून एकूण मतदारांचा विचार केला तर पुरुष उमेदवार 3 हजार 237 आहे. तर दुसरीकडे 235 महिला उमेदवार निवडणूकीच्या मैदानात आहेत. त्याचबरोबर एक तृतीय पंथी निवडणुकीच्या मैदानात आहेत.

एकूण 8 कोटी 97 लाख 22 हजार 19 मतदारांसाठी राज्यात एकूण 96,661 मतदानकेंद्रं उभारण्यात आली आहेत, तर 1,35,021 VVPAT मशीन देखील बसवण्यात आली आहेत.

Updated : 21 Oct 2019 5:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top