या दिवंगत नेत्याच्या पत्नीसह आई ने देखील बजावला मतदानाचा हक्क
Max Woman | 21 Oct 2019 6:14 AM GMT
X
X
माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्यासह आर.आर. पाटील यांची आई भागीरथी पाटील यांनी मतदान केलं. आज सकाळी 8.30.वा.सुमारास त्यांच्या गावी अंजनी येथे मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. आज राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी आणि सातारा लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूकीसाठी मतदान होत आहे.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष मिळून एकूण मतदारांचा विचार केला तर पुरुष उमेदवार 3 हजार 237 आहे. तर दुसरीकडे 235 महिला उमेदवार निवडणूकीच्या मैदानात आहेत. त्याचबरोबर एक तृतीय पंथी निवडणुकीच्या मैदानात आहेत.
एकूण 8 कोटी 97 लाख 22 हजार 19 मतदारांसाठी राज्यात एकूण 96,661 मतदानकेंद्रं उभारण्यात आली आहेत, तर 1,35,021 VVPAT मशीन देखील बसवण्यात आली आहेत.
Updated : 21 Oct 2019 6:14 AM GMT
Tags: assembly elections 2019 bhagirathi patil haryana elections haryana maharashtra election 2019 maharashtra maharashtra assembly election 2019 maharashtra assembly elections maharashtra assembly elections 2019 maharashtra elecions maharashtra election maharashtra election 2019 maharashtra election rally maharashtra elections maharashtra elections 2019 maharashtra haryana election maharashtra polls suman r r patil
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire