Home > रिपोर्ट > भाजपच्या पंचम कलानींकडून राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांचा प्रचार

भाजपच्या पंचम कलानींकडून राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांचा प्रचार

भाजपच्या पंचम कलानींकडून राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांचा प्रचार
X

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी आणि महापौर पंचम कलानी यांच्यात उमेदवारीची चढाओढ होती. पंचम यांना उमेदवारी मिळणार असल्याचं सांगण्यात येत होतं मात्र, भाजपने पंचम कलानी यांना अखेरपर्यंत उमेदवारीसाठी झुलवत ठेवलं. त्यानंतर कुमार आयलानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

राष्ट्रवादी नेत्या ज्योती कलानी यांनी रातोरात एबी फॉर्म मिळवुन उमेदवारी सादर केली. त्यांच्या प्रचारासाठी उल्हासनगर महापालिकेच्या भाजपच्या महापौर आणि त्यांच्याच सूनबाई पंचम कलानी आता भाजपविरुद्ध उतरल्या आहेत.

सासूबाईंच्या प्रचारात उघड सामील झाल्याने पंचम यांना भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भाजपचे पालिकेतील गटनेते जमनु पुरस्वानी यांनी ही नोटीस पाठवली आहे. यावर पंचम कलानी यांनी “जरी ती नोटीस मिळाली तर, ती फाडून त्यांच्या तोडांवर मारेन” अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Updated : 17 Oct 2019 8:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top