Home > रिपोर्ट > सर्व राजकीय पक्षांनी कवाडेंवर बहिष्कार घातला पाहिजे– कांता नलावडे

सर्व राजकीय पक्षांनी कवाडेंवर बहिष्कार घातला पाहिजे– कांता नलावडे

सर्व राजकीय पक्षांनी कवाडेंवर बहिष्कार घातला पाहिजे– कांता नलावडे
X

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. संविधान बदलणं नवरा बदलण्या इतकं सोपं नसतं.. जेवढा मोठा कुंकू तेवढे नवरे अशा भाषेत टीकास्त्र केलं आहे. हा संपूर्ण महिलांचा अपमान आहे. त्यासाठी कवाडेंना कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि भाजपा पक्ष प्रमुखांशी आम्ही संपर्क केला आहे असं भाजपाच्या कांता नलावडे यांनी मॅक्सवुमनशी बोलताना सांगितलं आहे. कवाडेंच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो तसेच इतक्या खालच्या पातळीला जाणून कुठल्याही महिलेविषयी अशी टीका करणं अतिशय निंदनीय असून त्यांना धडा शिकवला पाहिजे जेणे करुन दुसऱ्या महिलेविषयी बोलताना हजारवेळा विचार करतील. तसेच महिलांना राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी अशी त्यांच्या चारित्र्यावर टीका करत आहे.

तसेच सर्व राजकीय पक्षांनी कवाडेंवर बहिष्कार घातला पाहिजे. हे विधान सर्व महिलांचा अपमान आहे. कुठल्याही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असा सवाल कांता नलावडे यांनी केला आहे.

Updated : 2 April 2019 11:59 AM GMT
Next Story
Share it
Top