Home > रिपोर्ट > जेएनयूमधील हल्ल्याचा बॉलिवूडमधून तीव्र निषेध

जेएनयूमधील हल्ल्याचा बॉलिवूडमधून तीव्र निषेध

जेएनयूमधील हल्ल्याचा बॉलिवूडमधून तीव्र निषेध
X

जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याचे आता देशभरात तीव्र पडसाद उमटू लागलेत. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय.

क्रिती सेनन

जेएनयूमध्ये जे काही झालंय, त्यामुळे मला प्रचंड वेदना झाल्या आहेत. भारतात जे काही सुरू आहे ते भयावह आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण होतेय आणि चेहरा लपवणारे भित्रे लोक दहशत निर्माण करतायत. फक्त आरोप-प्रत्यारोप होत आहेत, राजकीय फायद्यासाठी या थराला जाणं हा काही उपाय नाही. आपण इतके अमानुष कधीपासून झाले आहोत?

तापसी पन्नू

जिथं भवितव्य घडवलं जातं असं आपण मानतो तिथं पाहा काय अवस्था आहे. ही कायमची जखम झालीये, कधीही न भरुन येणारं नुकसान झालंय. हे कशाप्रकारचं भविष्य आपण घडवतोय याचा आपल्याला विचार करावा लागेल, अतिशय दु:खद आहे.

such is the condition inside what we consider to be a place where our future is shaped. It’s getting scarred for ever. Irreversible damage. What kind of shaping up is happening here, it’s there for us to see.... saddening https://t.co/Qt2q7HRhLG

— taapsee pannu (@taapsee) January 5, 2020

अपर्णा सेन

जेएनयूच्या विद्यार्थ्यांना एबीव्हीच्या गुंडांना मारहाण केलीये, तेही टीव्हीवर लाईव्ह ! हे असं तुम्ही कधीपर्यंत पाहत राहणार आहात की तुम्हाला कणाच नाहीये का? हो मी लिबरल आहे, सेक्युलर आहे आणि हाच जर पर्याय असेल तर मला त्याचा अभिमानही आहे. एबीव्हीपी आणि त्यांना साथ देणाऱ्या पोलिसांचा निषेध निषेध !

रितेश देशमुख

तुम्ही चेहरा लपवून हे का केलं? कारण तुम्ही चुकीचं, बेकायदेशीर आणि शिक्षापात्र गुन्हा करताय हे तुम्हाला माहितीये. जेएनयूमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना गुंड अमानुषपणे मारहाण करत असल्याची दृश्यं पाहणं अतिशय लाजिरवाणं आहे. अशी हिंसा कधीही सहन केली जाणार नाही.

Updated : 6 Jan 2020 11:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top