Home > रिपोर्ट > असंच काही होत असेल, तर सुधारित नागरिकत्व कायदा विसरुन जायला हवा- परिणीती चोप्रा

असंच काही होत असेल, तर सुधारित नागरिकत्व कायदा विसरुन जायला हवा- परिणीती चोप्रा

असंच काही होत असेल, तर सुधारित नागरिकत्व कायदा विसरुन जायला हवा- परिणीती चोप्रा
X

नागरिकत्व दुरुस्ती कायदा संमत झाल्यापासून देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. राजधानी दिल्लीसह काही ठिकाणी या संघर्षाला हिंसक वळण लागल्यानं यावरचं राजकारणही तापू लागलं आहे. त्यानंतर आता याचे पडसाद बॉलिवूडमध्ये देखील उमटू लागले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील यावर व्यक्त होऊ लागले आहेत.

अभिनेत्री परिणीती चोप्राने एक ट्विट केलं आहे यामध्ये “जर प्रत्येक वेळी नागरिकांनी त्यांचे विचार मांडल्यानंतर असंच होत असेल, तर सुधारित नागरिकत्व कायदा विसरुन जायला हवा. आपण हे विधेयक स्वीकारावं आणि आपल्या देशाला लोकशाही देश म्हणणं सोडून द्यावं. आपलं मत मांडणाऱ्या निर्दोष व्यक्तींना मारहाण करण्यात येत आहे?” असं ट्विट परिणीती चोप्राने केलं आहे.

Updated : 17 Dec 2019 6:47 PM IST
Next Story
Share it
Top