अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेले 10 महत्त्वाचे मुद्दे
Max Woman | 15 Sept 2019 3:48 PM IST
X
X
देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या हातात आहे. देशात सध्या आर्थिक मंदीचं वातावरण आहे. निर्मला सितारामन यांनी शनिवारी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी गृह क्षेत्र व निर्यातदारांसाठी काही नव्या योजना जाहीर केल्या होत्या. याचवेळी त्यांनी महागाई नियंत्रणात येत असल्याचाही दावा केला. आर्थिक सुधारणा करण्यासाठी आत्तापर्यंत त्यांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यानंतर काल त्यांनी तिसरी पत्रकार परिषद घेतली. काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हाउसिंग सेक्टर साठी महत्वाची घोषणा केल्या.
1. काल झालेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सितारमण यांनी हाउंसिग सेक्टरसाठी 10 हजार कोटींच्या निधीची घोषणा केली. हा निधी 60 टक्के पूर्ण झालेल्या आणि निधी अभावी अडकून पडलेल्या घरांसाठी दिला जाणार आहे. फक्त यामध्ये घरांचा प्रकल्प एनपीए असावा.
2. सरकार घर खरेदी करण्यासाठी विशेष खिडकी योजना आमलात आणणार असून यातून लोकांना घर खरेदीसाठी मदत करण्यात येईल. यामध्ये एक्सपर्ट लोकांचा समावेश असणार.
3. निर्यात क्षेत्राला बुस्ट
निर्मला सितारमण यांनी निर्य़ात क्षेत्राला बुस्ट देण्यासाठी निर्यात करण्यासाठी लागणार वेळ कमी व्हावा म्हणून पावलं उचलली जाणार असल्याचं सांगितलं. निर्यात क्षमता वाढवण्यासाठी 36 ते 38 हजार कोटीचा निधी दिला जाणार.
4. मर्चन्डाइज एक्सपोर्ट फ्रॉम इंडियन स्कीम 1 जानेवारी पासून समाप्त करण्यात येईल. त्या ऐवजी RoDTEP ही स्किम एक जानेवारी पासून लागू करण्यात येणार आहे. नवीन RoDTEP मुळे 50 हजार कोटीचा फायदा होणार आहे.
5. वार्षिक मेगा शॉपिंग फेस्टिवलचं देशात पूर्ण चार जागेवर आयोजन करण्यात येणार आहे. हे आयोजन मार्च 2020 पासून सुरु होणार...
6. वार्षिक मेगा शॉपिंग फेस्टिवलमध्ये हिरे - दागिने, योगा आणि पर्यटन, टैक्सटाइल्स त्याबरोबरच चामड्याच्या क्षेत्रात या फेस्टिवलचं आयोजन करण्यात येणार.
7. निर्यात वाढवण्यावर सरकारचा भर असणार असून जुन्या आरओएसएल डिसेंबर 2019 पर्यंत सुरु राहणार. वैयक्तिक लाभ जनतेपर्यत पोहोचत आहेत. औद्योगिक उत्पादन आणि स्थिर गुंतवणूक वाढण्याचे संकेत मिळत असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.
8. ई असेसमेंट स्कीम दसऱ्या पासून सुरु केली जाणार. ही योजना पुर्णपणे ऑटोमॅटीक आहे.
9. पार्शल क्रेडिट गारंटी स्कीमची घोषणा करण्यात आली असून या योजनेमुळे बॅक आपल्या संपत्तीत वाढ करु शकते.
10. 19 सप्टेंबरला आपण देशातील सरकारी बॅंकांच्या प्रमुखांशी या संदर्भात भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितले.
Updated : 15 Sept 2019 3:48 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire