Home > रिपोर्ट > Coronavirus : देशातील आकडा हजारावर राज्यात 186 रुग्ण

Coronavirus : देशातील आकडा हजारावर राज्यात 186 रुग्ण

Coronavirus : देशातील आकडा हजारावर  राज्यात 186 रुग्ण
X

राज्यात कोरोना व्हायरस चा विळखा वाढताना दिसत आहे. आज राज्यातील कोरोना व्हायरस ची संख्या सकाळी 186 वर गेली आहे. गेल्या 24 तासात राज्यात नवीन 33 coronavirus बाधित रुग्णांची नोंद झाली. मुंबईत झालेल्या डॉक्टरच्या मृत्यूचं कारण कोरोना व्हायरस चं असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे..

एकाच कुटुंबात सांगली जिल्ह्यामधील इस्लामपूर तालुक्या मध्ये 23 रुग्णांना कोरोना व्हायरस ची लागण झाल्याने हे शहर पुर्णपणे लॉक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मागील 24 तासात आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या मुंबईत असून मुंबईत 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर पुण्यात 4, नागपूरचे 2, जळगावचा 1 तर पालघर, वसई, विरार आणि नवी मुंबई परिसरतील 4 व्यक्तींना कोरोना व्हायरस ची लागण झाली आहे.

मागील 24 तासात 323 जणांना राज्यात विविध रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे. तर सध्या बाधित भागातून आलेल्या प्रवाशांपैकी ३८१६ जणांची विलगीकरण कक्षात भरती केली. त्यापैकी ३३९१ जणांचे प्रयोगशाळा नमुन निगेटिव्ह आलेले आहे. तर आत्तापर्यंत बरे झालेल्या २६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

सध्या राज्यात १७ हजार २९५ व्यक्ती #HomeQuarantine तर ५९२८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

देशात काय परिस्थिती?

महाराष्ट्रानंतर केरळ मध्ये कोरोना व्हायरस ची संख्या सर्वाधिक आहे. केरळ मध्ये 176 रुग्ण कोरोना व्हायरस ने बाधीत आहेत. तर देशात 1029 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 85 लोकांना बरं करण्यात आरोग्य यंत्रणांना यश आलं आहे.

तुमच्या जिल्हात किती रुग्ण आहेत?

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये काल कोरोना व्हायरस चा एक रुग्ण आढळला आहे.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 186

मुंबई – 73

पुणे – 23

पिंपरी-चिंचवड – 12

सांगली – 24

नागपूर – 11

कल्य़ाण-डोंबिवली – 7

नवीमुंबई – 6

ठाणे – 5

यवतमाळ – 4

अहमदनगर – 3

पनवेल – 2

सातारा – 2

उल्हासनगर – 1

वसई-विरार – 1

पालघऱ – 1

सिंधुदुर्ग – 1

औरंगाबाद – 1

रत्नागिरी – 1

कोल्हापूर – 1

गोंदिया – 1

जगात काय स्थिती?

जगामधील रुग्णांची संख्या : 575,444

जगाभरातील मृत्यूची संख्या : 26,654

किती देशात पसरला आहे : 202

Updated : 29 March 2020 4:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top