Home > रिपोर्ट > कोरोनाने गाठलं सहा महिन्यांच्या बाळाला !

कोरोनाने गाठलं सहा महिन्यांच्या बाळाला !

कोरोनाने गाठलं सहा महिन्यांच्या बाळाला !
X

कल्याणात राहणाऱ्या एका गृहस्थांचा तपासणी अहवाल पूरक आल्यानंतर त्यांचा नातू असलेलं सहा महिन्यांचं बाळ कोरोना बाधीत असल्याचं दिसून आलंय. आजोबा आणि नातू कस्तुरबात उपचार घेत आहेत.

कल्याणात रामबाग परिसरात राहणारे कुटुंब परवापासून भयभीत आहे, जेव्हा त्यातील कर्त्या गृहस्थांचा अहवाल एका खाजगी लॅबने कोरोना पूरक दिला. त्यामुळे ते कुटुंब स्वत: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रूक्मिणीबाई रुग्णालयात गेलं. तिथून ते गृहस्थ व त्यांच्या विवाहित मुलाला कस्तुरबात हलवण्यात आलं. तर गृहस्थांची पत्नी, सून व दोन नातू यांना शास्त्रीनगर रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं.

परंतु, बाळ तापाने फणफणलेलं होतं व शास्त्रीनगर रुग्णालयात बालतज्ज्ञ नव्हते. त्यामुळे बाळ व बाळाच्या आईला मुंबईत हाजिअलीला एसआरसीसीला पाठवण्यात आले, परंतु त्यांनी एडमीट करण्यास नकार दिल्याने मग कस्तुरबाला हालवण्यात आलं. दरम्यान बाळाचा तपासणी अहवाल कोरोना पूरक असून कुटुंबातील इतर सदस्यांचा अहवाल यायचाय, ज्यात गृहस्थाची पत्नी, मुलगा, सून व तीन वर्षांच्या नातवाचा समावेश आहे.

Updated : 4 April 2020 8:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top