राजकारणात उर्मिला मातोंडकर का झाल्या सक्रिय
X
साने गुरूजी आणि शिवाजी महाराजांना आदर्श मानणा-या उर्मिला मातोंडकर या व्यवसायाने चित्रपट अभिनेत्री आहेत. शिवाय त्यांना सामाजिक बांधिलकीची उत्तम जाण आहे. त्या एक संवेदनशील व जागरूक नागरिक आहेत. त्या मूळच्या गोव्याच्या आहेत. त्यांना एक भाऊ आणि एक बहिण अशी भावंडे आहेत. 1980 सालापासून त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपट अभिनयाची कारकिर्द सुरू केली. त्यांना अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मराठी, हिंदीसह त्यांनी विविध दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी मुस्लिम तरूणाशी विवाह केला.. सोशल मीडियावर उर्मिला नेहमी चाहत्यांना अपडेट देत असतात. राजकारणात त्या यापूर्वी सक्रिय नव्हत्या मात्र यंदाच्या लोकसभा निवडणूकांच्या दरम्यान पक्षात सामील होण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला आणि आता त्या उत्तर मुंबई मतदारसंघातून त्या लोकसभा निवडणूक लढवत आहे.