Home > रिपोर्ट > पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसांच्या हाती बूट, रुपाली चाकणकर म्हणतात...

पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसांच्या हाती बूट, रुपाली चाकणकर म्हणतात...

पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसांच्या हाती बूट, रुपाली चाकणकर म्हणतात...
X

पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर औरंगाबादमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत देवेंद्र फडणवीस हातात बूट घेऊन उभे असल्याचं दिसत आहे. मात्र राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस टोला लगावत टीका केली आहे. त्यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, आपण गेली पाच वर्षे राज्याचा विकास किती जलदगतीने केलाय, हे घसा ताणून सांगत होतात. प्रत्येक भाषणात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे, हे ढोल बडवत सांगत होतात. चक्क आपण आज आंदोलनात सहभागी झालात. आपल्याच लोकांवर विश्वास नाही. चोरांच्या टोळीत बसलोय की काय, असा विश्वास वाटत असेल म्हणून बुट हातात घेऊन भाषण केले. विरोधात आहेत मान्य आहे, पण महाविकासआघाडी सत्तेत येऊन महिनाच झाला आहे. पाच वर्षातील तुमच्या सत्तेतील हिशोब द्या”

असं लिहत त्यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट टाकून रुपाली चाकणकर यांनी कार्यकर्त्यावर विश्वास नसून चोराच्या टोळीत बसल्या सारखे वाटत आहे का असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

Updated : 28 Jan 2020 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top