Home > रिपोर्ट > कोरोना संकटकाळात ‘या’ महिलांना मदत न मिळाल्यास होतील गंभीर परिणाम..

कोरोना संकटकाळात ‘या’ महिलांना मदत न मिळाल्यास होतील गंभीर परिणाम..

कोरोना संकटकाळात ‘या’ महिलांना मदत न मिळाल्यास होतील गंभीर परिणाम..
X

राज्यात कोरोना चे (CoronaVirus) रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यात मुंबईचा आकडा झपाट्याने वाढतोय. कोरोनाला रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत वाढवण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यासंबंधित निर्णय घोषित करणार आहेत.

या कठीण काळात कुटुंबातील कमावती व्यक्ती घरात बसलेली असताना आता त्यांना भविष्याची चिंता सतावत आहे. नोकरकपात होण्याची टांगती तलवारही आता अनेकांवर आहे. अशात कोरोनाच्या संकटकाळात घरबसल्या जीवनावश्यक वस्तूंची गरज भागवणे कठीण होणार आहे.

या काळात निराधार, विधवा अशा स्त्रियांचे हाल होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. कोणताही आर्थिक मिळकतीचा आधार नसलेल्या निराधार महिलांची उपासमारही होऊ शकते. म्हणूनच राज्यातील निराधार, विधवा, घटस्फोटीता, परित्यक्त्या आणि ज्येष्ठ नागरिकांना सरकारने त्वरित मदत करावी अशी मागणी माजी महसुलमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

लॉकडाऊनचा कालावधी वाढणार असल्यामुळे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने तीन महिन्याची आगाऊ रक्कम ३ हजार रुपये आणि केंद्र सरकारचे एक हजार रुपये असे मिळून ४ हजार रुपये यांना मिळाल्यास मोठी मदत होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केलीय.

“महाराष्ट्रामध्ये ३४ लक्ष निराधार, विधवा, घटस्फोटीता, परितक्त्या आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रावणबाळ आणि निवृत्तीवेतन योजनेमध्ये मदत करतो. यांना ताबडतोब अनुदान देण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने या योजनेमध्ये १००० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनेही येत्या तीन महिन्याचं अनुदान येत्या दोन दिवसात वितरीत करणं या कोरोनाच्या संकटामध्ये आवश्यक आहे.” अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

Updated : 14 April 2020 1:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top