Home > रिपोर्ट > अरुंधती रॉय यांची मोदी सरकारवर टीका

अरुंधती रॉय यांची मोदी सरकारवर टीका

अरुंधती रॉय यांची मोदी सरकारवर टीका
X

जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील नजीब अहमद हा विद्यार्थी बेपत्ता तीन वर्षांपासून बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यात दिल्ली पोलीस, एनआयए, सीबीआय या सरकारी संस्था अपयशी ठरल्या. याच्या निषेदार्थ विद्यार्थ्यांनी जंतरमंतर या ठिकाणी आंदोलन केलं. या आंदोलनाला 400 विद्यार्थी त्याचसोबत नजीबची फॅमिली, मॉब लीचिंगमध्ये मारल्या गेलेल्या तबरेजची पत्नी हजर होत्या.

भाजपाच्या काळात देश आर्थिकबाबतीत पिछाडीवर गेला आहेच, शिवाय न्यायव्यवस्था, शिक्षण, पत्रकारिता, मानवाधिकार, संरक्षण या सगळ्याच क्षेत्रात देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. हिंदुत्ववादी विचार पसरवण्यासाठी सगळ्या पातळ्यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे. मुस्लिम समाजाला हेतुपुरस्सर लक्ष्य केलं जातं आहे. देशातील सध्याचे वातावरण अत्यंत लाजिरवाणे असून आपला देश महान ठरत नाही” अशी टीका अरुंधती रॉय यांनी मोदी सरकारवर केली.

भारतीय संविधानानुसार देशाचा कारभार सुरु झाला तर पुन्हा एकदा हा देश रुळावर येईल, महान ठरेल. मात्र सध्या अशी स्थिती नाही असंही त्या म्हणाल्या. एवढंच नाही तर हे सरकार आगामी काळात राष्ट्रीय नागरिकत्त्व कायदा लागू करु शकतं असाही अंदाज त्यांनी वर्तवला.

Updated : 16 Oct 2019 12:47 PM IST
Next Story
Share it
Top