Home > रिपोर्ट > तिने घेतला हा धाडसी निर्णय

तिने घेतला हा धाडसी निर्णय

तिने घेतला हा धाडसी निर्णय
X

स्त्रीचे लांब, काळेभोर आणि जाड केस हे सौंदर्याचे प्रतिक मानलं जातं. जणूकाही स्त्रीसाठी तिचे केस ही तिच्या सौंदर्याची ओळख असते. ही प्रतिके आणि स्त्रीत्वाची ओळख याला फाटा येत तिने एक धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे कॅन्सरग्रस्तांना केसदान करण्याचा… अशा या झाशीच्या राणीचे नाव आहे अर्पिता शंकर.

अर्पिता ही बँगलोर येथे राहणारी अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. मध्यमवर्गीय कुटुंबातील असली तरी तिच्या विचारांची आणि कार्याची उंची भरारी मोठी आहे. तिने समाजातील बुरसटलेल्या विचारांना, चौकटींना मोडून काढून नव्या वाटा निवडल्या. तिने आपले लांब आणि काळेभोर केस कॅन्सरग्रस्तांना दान केले. कॅन्सरच्या उपचारांदरम्यान किमोथेरपीमुळे हे स्त्रीयांचे केसच पूर्णपणे गळतात. हा अनुभव नुसताच वेदनादायी नाही, तर धक्कादायकही असतो. कॅन्सर झालाय, या भावनेपेक्षाही स्वत:ला आरशात विकेशा बघणं, हा धक्का मोठा असतो. त्यामुळे अशा पेशंटना मदतीचा हात आणि मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी कॅन्सर पेशंटसाठी या महिलांनी मोठ्या हौसेने वाढवलेले केस कापून टाकले आहेत. त्यानंतर तिला पडलेलं टक्कल हे सौंदर्याचे प्रतीक म्हणून अभिमानाने जगत होती.

खरंतर ती लहान दोन मुलींची आई आहे तिला विविध प्रश्नांना घरापासून तोंड द्यावे लागणार ही जाणीव होती. तरी देखील तिने दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी हा निर्णय घेतला. याशिवाय ती स्त्री म्हणून स्त्रियांसाठी बरंच काम करते.

आपल्या आसपासच्या परिसरात नॅचरल चाइल्ड बर्थ याविषयी जनजागृती करते.स्त्रियांचे विविध शारीरिक, मानसिक समस्यांवर उपाय , कौन्सिल करते.यासर्व गोष्टी ती दोन मुलींना सोबत घेऊन करते ही विशेष! त्यांच्यामध्ये असे विचार जागृत होण्यासाठी तिने होमस्कुलिंग हा पर्याय निवडला . यामुळे मुलींपुढे तिचा वेगळा आदर्श निर्माण झाला आहे . तसेच ही कित्येकांची प्रेरणास्थान देखील बनली आहे ‌. एक स्त्री ठरवलं तर काहीही करू शकते.कितीजरी संकट, सामाजिक चौकटी असल्यातरी हसतमुखाने त्यावर मात करू शकते.हेच यातून सिद्ध होतंय.

Updated : 18 Jun 2019 5:29 AM GMT
Next Story
Share it
Top