Home > Max Woman Blog > आता रंगणार अमृता विरुद्ध रश्मी सामना ...

आता रंगणार अमृता विरुद्ध रश्मी सामना ...

आता रंगणार अमृता विरुद्ध रश्मी सामना ...
X

‘सामना’ च्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळं आता अमृता फडणवीस विरुद्ध रश्मी ठाकरे असा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. अलीकडे अमृता फडणवीस या ट्विटरवर चांगल्याच Active झाल्या असून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. विशेष बाब म्हणजे यावर ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, आता ‘सामना’ ची जबाबदारी रश्मी ठाकरेंवर आल्यानं अमृता फडणवीस यांच्या टीकेला उत्तर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांचं ट्विट आणि रश्मी ठाकरे यांचा ‘सामना’ यांमध्ये सामना भिडणार हे आता स्पष्ट झालं आहे.

उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या पदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती कोणत्याही लाभाच्या पदावर असता कामा नये. म्हणून उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ च्या संपादक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ‘सामना’ ची संपुर्ण जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्याकडे आली होती. ते ‘सामना’ चे कार्यकारी संपादक आहेत.

रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) पक्षातील प्रचारामध्ये अनेक वेळा पाहायला मिळतात. मात्र, त्यांच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही जबाबदारी टाकली नव्हती. ठाकरे कुटुंबातील त्या पहिल्या महिला आहेत. ज्या पक्ष संघटनेच्या एका पदाची जबाबदारी घेतील. ‘सामना’ हे शिवसेनेचं मुखपत्र आहे.

रश्मी ठाकरे च्या रुपाने सामनाला पहिल्यांदाच महिला संपादक मिळाल्या आहेत. सामनाचं संपादक पद स्वीकारणाऱ्या त्या तिसऱ्या व्यक्ती असतील. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राची सुरुवात केली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ही जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली होती. मात्र, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांनी संपादक पदाची धुरा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवली आहे.

मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर ‘सामना’कडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणून आपल्याकडे असलेल्या संपादकीय पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या ‘अर्धागिनीकडे’ सोपवली खरी, मात्र, ‘सामना’ चे संपादक पद म्हणजे मोठी कसरत आहे. त्यातच ‘सामना’ तून सतत विरोधकांवर तिखट शब्दात तोंडसुख घेतलं जातं. त्यामुळं रश्मी ठाकरे ही जबाबदारी कशी पार पाडतात हे पाहणं महत्वाचं आहे.

Updated : 1 March 2020 7:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top