अमरावती पंचायत समिती निवडणूकीत शिक्षित महिलांनी मारली बाजी
Max Woman | 10 Dec 2019 11:23 AM GMT
X
X
अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीची निवडणूक झाली याचे निकाल आज जाहीर झाले यात ५० टक्के आरक्षण असल्याने ६ पैकी ३ जागा महिलांनी जिंकल्या विशेष म्हणजे या पंचायत समितीत सभापती पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला हे असल्याने महिला राज या पंचायत समितीवर असणार आहे ह्या विजयी तिन्ही महिला काँग्रेस पक्षातर्फे निवडुन आल्यात या मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर या सुद्धा महिला असल्याने येथे महिलांचा सन्मान झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तर चांदूर रेल्वे तालुक्यातुन स्त्री च्या चारही राखीव गणातुन भाजपाच्याच महिला उमेदवार निवडुन आल्या आहे.
तिवसा पंचायत समिती
वरखेड सर्कल मधून रोशनी पुनसे ह्या पदवीधर आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेऊन त्या विजयी झाल्यात त्यांचे गाव वणी असुन त्यांचे पती मुकूंद पुनसे हे वणी ग्रामपंचायतचे सरपंच आहेत. अवघ्या२६ व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश करून त्यांनी विजय मिळवला. घरात राजकीय वारसा नाही मात्र त्यांनी आपल्या प्रचाराचा व कामाची हमी देऊन विजय मिळवला. रोशनी पुनसे ह्या धनगर समाजातून असून त्यांच्या सर्कल मध्ये सर्वाधिक मते धनगर समाजाचे होते मात्र त्यांच्या विरोधात त्यांच्याच धनगर समाजाच्या शिवसेना उमेदवार संगीता बांबल होत्या.
मार्डा सर्कल मधून काँग्रेसच्या शिल्पा हांडे विजयी झाल्यात त्या पदवीधर आहेत. त्यांचे मूळ गाव मार्डा आहे घरात राजकीय वारसा नाही मात्र तरीही त्यांनी विजयी माळ आपल्या गळ्यात पाडली. त्या पदवीधर असल्याने त्यांच्या शिक्षना मुळे अभ्यासू उमेदवार त्या असल्याने त्यांना तो लाभ मिळाला. त्या तेली समाजातून आहेत
तळेगाव ठाकुर कल्पना दिवे 12 वी पास आहेत, त्या तळेगाव ठाकुर येथील रहिवासी असून त्यांच्या घरात राजकीय वारसा आहेत त्यांचे सासरे अण्णाजी दिवे हे सहकार क्षेत्रात अग्रेसर असून त्यांचे मोठं काम येथे आहेत. कल्पना दिवे ह्या आपल्या गावात बचत गटाच काम करून महिलांना एकत्रित करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देतात. त्यामुळे महिलांशी असलेली जवळीक त्यांना फायदेशीर ठरली
धामणगाव रेल्वे पंचायत समिती
जुना धामणगाव येथून पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून बेबी उईके या विजयी झाल्यात अतिशय सामान्य कुटुंबातून आहेत त्यांनी पहिली वेळा पंचायत समिती निवडणूक लढवली यात त्यांना यश मिळालं या अगोदर त्यांनी आदिवासी महिला च्या विविध मागण्यांवर काम केलेला आहे.
धामणगाव ते देवगाव सर्कलमधून पहिली वेळ पंचायत समिती रिंगणात उभा राहून जयश्री शेलोकार यांनी विजयश्री मिळवली आहे. त्यांनी महिलांसोबत सातत्याने संपर्क ठेवून बचत गट च्या माध्यमातून महिलांची अनेकदा संवाद चाललाय यांचे पती ग्रामपंचायत सदस्य म्हणून मागील दहा वर्षापासून सोनेगाव खर्डा येथे कार्यरत आहेत.
अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सर्वसामान्य लोकांना न्याय व समाजातील कामे मार्गी लावण्यासाठी माधुरी दुधे यांनी पंचायत समिती निवडणूक लढवून विजयश्री मिळवली आहेत घरी छोटासा किराणा दुकानातून त्यांचा घर संसार चालतो मात्र समाजासाठी काहीतरी करण्यासाठी त्यांनी पंचायत समिती मध्ये निवडणूक जिंकून कामे मार्गी लावण्याच ध्येय निश्चित घेतलेल आहे.
तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा सर्कल म्हणजे मंगरूळ दस्तगीर. जयश्री ढोले यांनी पहिली वेळा पंचायत समिती निवडणूक लढवून विजयश्री मिळवली आहे त्या मंगरूळ दस्तगीर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आहेत मागील काळात त्यांचे पती ग्रामपंचायत सदस्य होते समाजोपयोगी कामे करताना त्यांना विजय मिळवता आल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
चांदूर रेल्वे पंचायत समिती
घुईखेड (अनुसूचित जाती (स्त्री) गणामधून भाजपाच्या शुभांगी अमोल खंडारे ७६० मतांनी विजयी झाल्या. विशेष म्हणजे या महिलेची परिस्थिती हलाखीची असुन कुठलाही राजकीय वारसा नाही. गावकऱ्यांनी निवडणुकीत त्यांच्यासाठी वर्गणी केली होती. महिलेचे पती मेकॅनिकचे काम करतात. प्रथमच राजकारणात उतरून विजयी मिळविल्याने अनेक कामे गोरगरीबांसाठी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्या १० वा वर्ग पास आहे.
आमला विश्वेश्वर ना.मा.प्र.(स्त्री) या गणातून भाजपाचा प्रतिभा धनंजय डांगे (भाजप) विजयी ५०९ मताने विजयी झाल्या. प्रतिभा डांगे ह्या खाजगी शिक्षीका असुन पतीसुध्दा शिक्षक आहे. पतीचा भाऊ हा राजकारणात होता. याव्यतिरिक्त कुठलाही राजकीय वारसा नाही. त्या उच्चशिक्षीत उमेदवार होत्या.
सातेफळ (सर्वसाधारण स्त्री) गणातून भाजपच्या कु. श्रद्धा बाबाराव वऱ्हाडे ५३० मतांनी विजयी झाल्या. श्रध्दा ही २८ वर्षीय अविवाहीत असुन तीने सिव्हील इंजीनिअरींगची पदवी घेतली आहे. तिचे वडील बाबाराव वऱ्हाडे हे गेल्या ४० ते ४५ वर्षापासुन राजकारणात आहे. त्यांनी आमदार अरूण अडसड यांच्यासोबत संघात काम केले आहे. सर्वात कमी वयाची व उच्चशिक्षीत तरूणी आहे. २८ वर्षीय तरूणी असल्यामुळे त्यांची जोमात काम करण्याची इच्छा आहे.
पळसखेड (नामाप्र) गणातून भाजपच्या सरीता शामबाबु देशमुख १ हजार ६३ मतांनी विजयी झाल्या. सुरूवातीला सरिता देशमुख ह्या राजकारणात सक्रीय नव्हत्या. त्यांचे पती हे सहकार क्षेत्रातील नेते होते. परंतु पतीच्या निधनानंतर त्यांनी प्रथमच राजकारणात पाऊल टाकताच यशस्वी झाल्या. चांदूर रेल्वे तालुक्यातुन सर्वाधिक मतांनी त्या विजयी झाल्या आहे. पतीच्या निधनानंतर आता सरिता देशमुख यांचा समाजसेवा करण्याचा मानस आहे.
Updated : 10 Dec 2019 11:23 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire