रंगोलीने मुस्लीम समुदायाविरोधात ट्वीट केलं असल्यास स्वत: माफी मागेन- कंगणा रणावत
X
प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री कंगणा रनावत (Kangana Ranawat) अखेर आपल्या बहिणीच्या पाठीशी उभी राहिली आहे. रंगोलीचं ट्वीटर अकाऊंट प्रक्षोभक वक्तव्यांमुळे ट्वीटर कडून बंद करण्यात आलं होतं. दिग्दर्शिका फराह खान आणि रिमा कागती यांनी तीच्या ट्वीटर पोस्टला मुस्लीम समुदायाप्रती आपत्तीजनक वक्तव्य करण्यावरुन ब्लॉक करण्याची विनंती केली होती.
संबंधित बातम्या...
- जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावरुन रंगोलीला ट्वीटरचा दणका
- उद्धव ठाकरेंवर टीकेप्रकरणी कंगणाच्या बहिणीला नेटकऱ्यांनी झोडपले..
- 'मुंबईचं इटली होणार, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज'
याविषयी कंगणाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. “जे लोक डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ला करत आहेत त्यांना गोळी मारली पाहिजे. मात्र फराह अली खान आणि रिमा कागटी यांनी खोटा दावा केला आहे की रंगोली ने मुस्लीम समुदायासाठी म्हटलं आहे. मुस्लीम समुदायाविरोधात रंगोली ने असं कोणतही ट्वीट केलेलं आढळल्यास मी आणि रंगोली स्वत:हून माफी मागू.” असं मत कंगणाने व्यक्त केलं आहे.
कंगणा पुढे केंद्र सरकारला विनंती केली आहे की, “ट्वीटर सारखे सोशल मीडिया प्लेटफॉर्म जे इथेच खाऊन, करोडो अरबो रुपये कमावून आपल्याच नावेत छेद करत आहेत. इथे प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि आरएसएस(RSS) सारख्या दिवस रात्र लोकांची सेवा करणाऱ्या लोकांना आतंकवादी म्हणू शकता पण आपण खऱ्या आतंकवादींना आतंकवादी म्हणू शकत नाही. त्यांमुळे या माध्यामांचं दानापाणी बंद झालं पाहिजे.”