Home > रिपोर्ट > अखेर ‘त्या’ चिमुकलीच्या बलात्काऱ्याला फाशी

अखेर ‘त्या’ चिमुकलीच्या बलात्काऱ्याला फाशी

अखेर ‘त्या’ चिमुकलीच्या बलात्काऱ्याला फाशी
X

देशभरात सध्या निर्भयाच्या आरोपींना फाशीचा मुद्दा पेटलेला असताना परभणीच्या गंगाखेड सत्र न्यायालयाने पाच वर्षाच्या चिमुरडीवर दुष्कर्म करून खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा सुनावलीये. गंगाखेड सत्र न्यायालयाच्या न्यायमुर्ती एस.जी. इनामदार यांनी आरोपी विष्णू गोरे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

2017 साली सोनपेठ तालुक्यातील शेलगाव येथे आई वडील नसलेल्या 5 वर्षाच्या मुलीसोबत दुष्कर्म करून तिचा गळा आवळून विहिरीत फेकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. सोनपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासात आरोपी विष्णू गोरे याला अटक केली होती.

आज कोर्टाने निकाल देताना घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. गंगाखेड न्यायालयाने आज सुनावलेल्या कठोर शिक्षेमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीवर आळा बसेलच, तसेच अत्याचाराच्या घटना ही कमी होण्यास नक्कीच मदत होईल अशी आशा व्यक्त केली जातेय.

Updated : 19 Feb 2020 10:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top