Home > रिपोर्ट > संघाने इंग्रजांची चमचेगिरी केली- प्रियंका गांधी

संघाने इंग्रजांची चमचेगिरी केली- प्रियंका गांधी

संघाने इंग्रजांची चमचेगिरी केली- प्रियंका गांधी
X

ज्यावेळी संपूर्ण पंजाब इंग्रजांच्या विरोधात लढत होता तेव्हा आरएसएसच्या लोकांनी इंग्रजांची चमचेगिरी केली. त्यांनी इंग्रजांचे नेहमीच समर्थन केले. प्रत्यक्षात संघाच्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यात कधीही सहभाग घेतला नाही, अशा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली.

दरम्यान पंजाबच्या भटिंडा येथील प्रचारसभेत प्रियंका गांधी बोलत होत्या. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने काहीच केले नसून जनतेला नेहमीच मोठ-मोठी आश्वासने दिली,मात्र काहीच कामे केले नाही. देशात बेरोजगारी झपाट्याने वाढली असून संरक्षण दलाच्या व्यवहारातही भाजप सरकारने घोटाळा केला. तसेच शेतकऱ्यांची या सरकारने फसवणूक केली आहे. असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला. पंजाबमध्ये अकाली सरकारने आपल्या कार्यकाळात काय केले हे सर्वांनाच माहीती आहे. त्यामुळेच येथील लोकांनी विधानसभेतच भाजप आणि अकाली दल यांना उत्तर दिले होते. आज पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेसमोर एक संधी असून त्यांनी बदल होण्यासाठी भाजप सरकार उलथवून टाकावे, असे आव्हान जनतेला केले.

Updated : 15 May 2019 7:38 AM GMT
Next Story
Share it
Top