Home > Max Woman Blog > म्हणून हा स्पर्श फार मोलाचा ठरतो...

म्हणून हा स्पर्श फार मोलाचा ठरतो...

म्हणून हा स्पर्श फार मोलाचा ठरतो...
X

पायाला वाटा फुटतात आणि मातीशी नाळ तुटते. तेंव्हा फक्त एक नाळ तुटत नाही. तर खोलवर रुजलेलं काहीतरी खळवळून जातं. हे स्वेच्छेन झालं तरी एक हळवेपण आयुष्यभरासाठी देऊन जातं. आयुष्यात सारखं स्वतःला उखडून घेण्याची सवय लागलेली असताना प्रत्येक वेळी येणारी अस्वस्थता एका माणसाकडे पहिली की शांत व्हायची. या माणसाच्या सावलीत काही क्षण घालवावे असं कितीदा वाटलं आयुष्यात आणि ते वाटणं निसर्गानंच मनावर घेतलं.

मेहता पब्लिशिंग हाऊस मध्ये production head ची जबाबदारी आली आणि समोर एकाहून एक धमाल पुस्तकं ताल धरू लागली. वर्षभरापूर्वी दलाई लामांची दोन पुस्तकं सुनील मेहतांनी हाती ठेवली. आणि सांगितलं याचं सगळं बाळंतपण तुम्ही करायचं. आणि ही पुस्तकं review करण्यापासून नंतरच्या जवळपास तीस चाळीस टप्प्यात जणू मी नव्यानं शाळेत नाव नोंदवलेलं ...पण या पुस्तकाची डमी हातात पडल्या क्षणापासून स्वतःबद्दल छान छान वाटू लागलं..पण प्रत्यक्ष कॉपी आल्या तेंव्हा पायाखालची जमीन सरकली. पुस्तकातल्या फोटोची छपाई पूर्ण खराब आली होती, डोळ्यापुढे जणू अंधारून आलेलं. घरी जाऊन रड रड रडले.

दुसऱ्या दिवशी सुजलेले डोळे घेऊन ऑफिसला गेले . सुनील मेहतांनी बोलावलं आणि सांगितलं, तांत्रिक चुकांमध्ये आपल्या हाती फार ऑपशन नसतात.नवा प्रिंटर शोधा , पण पुस्तकाचं प्रिंटिंग खराब नको. त्यांनी आधीच्या प्रिंटरला कॉपी उचलायला सांगितल्या..आणि पुन्हा शांतपणे माझ्यावर विश्वास टाकला. नव्याने कामाला लागायला सांगितलं..पुढच्या वेळी सगळं सुरळीत आणि वेळेतही पार पडलं.

.पण तेंव्हाही हे माहीत नव्हतं की हे पुस्तक दलाई लामांच्या हाती पोहोचवण्याची संधीही आपल्याला मिळणार आहे. दलाई लामांच्या ऑफिस मधून सुनील मेहतांना बोलावणं आलं तेंव्हाच त्यांनी सांगितलं की You will be there..And you will present the copies..

आणि आज तो दिवस उजाडला .

Image may contain: 4 people, people smiling, people standing

तो स्वतःच्या मातीला दुरावलेला हात हातात घेताना जीव थरथरत होता. तो स्पर्श तळहातावर कुठल्याही प्रदूषणाचा स्पर्शही न झालेला दूर आकाशातला अभ्र ठेवावा असा होता..अजून तसाच जाणवतोय तिथं..

मी, माझं, मला ची भाषा विसरून जायचं आहे ..म्हणून हा स्पर्श फार मोलाचा आहे.

आभार शब्द छोटा आहे.

-योजना यादव

Updated : 11 Dec 2019 8:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top