Home > रिपोर्ट > महिला सक्षमीकरणासाठी शिवसेना महिला आघाडीकडून मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदन

महिला सक्षमीकरणासाठी शिवसेना महिला आघाडीकडून मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदन

महिला सक्षमीकरणासाठी शिवसेना महिला आघाडीकडून मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदन
X

महिला आर्थिक सबलीकरण आणि महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण होण्यासाठी शासन अनेक उपाय योजना करत असतो. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्याचबरोबर महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे. यासाठीअकोला जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीकडून शिवसेनेचे परिवहन मंत्री अॅड अनिल परब यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी अकोला जिल्हा संघटीका लता चंदेल, यवतमाळ जिल्हा संघटीका सुनिता मिटांगे ,माजी जिल्हा संघटीका शारदा जायले, नागपूर जिल्हा संघटीका अंजुषा बोधनकर, अकोला सहसंपर्क प्रमुख ज्योत्स्ना चोरे, अमरावती जिल्हा सहसंपर्क संघटीका मनीषा तेंभरे या उपस्थित होत्या. शासनाच्या अनेक सुविधांचा थेट फायदा खेड्यातील महिलांना भेटत नसल्यामुळे अश्या महिलांना छोटे छोटे रोजगार मिळवून दिले असता अश्या महिलांची आर्थिक उन्नती होईल असं मत शिवसेना महिला आघाडीच्या महिला मॅक्सवूमनजवळ बोलताना म्हणाल्या. दरम्यान यावेळी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी व महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज निवेदनातून व्यक्त केली आहे.

https://youtu.be/VQT20diXh_8

Updated : 27 Jan 2020 1:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top