मराठमोळ्या ज्ञानेश्वरीला जागतिक बॅकेंची फेलॉशिप
X
जगातील कोणत्याही क्षेत्रात आता महिला पुरुषांपेक्षाही आघाडी घेताना दिसत आहेत. त्यातच जगामध्ये मोठ मोठ्या खासगी, सामाजिक, राजकीय संस्थांच्या प्रमुख म्हणून आता महिल उत्तम कामगिरी बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातच अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन देशाचं नाव मोठं केलं आहे. कल्पना चावला सारख्या भारतीय मुलीने अंतराळात क्षेत्रात देशाचं नाव मोठं केलं. हीच प्रेरणा घेऊन देशातील अनेक मुली जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थामध्ये जाऊन शिक्षण घेतात. आणि देशाचं नाव मोठं करतात. आपल्या महाराष्ट्राची ज्ञानेश्वरी चिंचोलकर हिने देखील परदेशात जाऊन शिक्षण घेतलं. तिनं न्यूयॉर्क लॉ युनिव्हर्सिटीमध्ये LLM (कायद्याचं) शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आता तिला जागतिक बॅकेकडून आंतरराष्ट्रीय, वित्त आणि विकास (International Finance and Development) या विभागात काम करण्यासाठी फक्त 12 आठवड्यांसाठी सुमारे 7 हजार डॉलर ची म्हणजे सुमारे 5 लाख रुपयांची फॅलोशिप मिळाली आहे.
https://twitter.com/DareDevilDaya/status/1222030342728667136?s=20