Home > रिपोर्ट > मनसेच्या रुपाली पाटील यांनी धनंजय मुंडेंच्या पत्नीचे केले कौतुक...

मनसेच्या रुपाली पाटील यांनी धनंजय मुंडेंच्या पत्नीचे केले कौतुक...

मनसेच्या रुपाली पाटील यांनी धनंजय मुंडेंच्या पत्नीचे केले कौतुक...
X

परळी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आणि राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच परळीत येत त्यांचे जोरात स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर या पार्श्वभूमीवर परळीत अनेक ठिकाणी कार्यक्रम देखील घेण्यात आले. दरम्यान परळीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मतदार संघात आभार कार्यक्रमाच्यावेळी मनसेच्या पुण्यातील माजी नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे या देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या व्यक्तिगत वागण्यातील एक किस्सा सांगितला "मंत्री पदा आधी असलेले धनंजय भाऊ मुंडे आपण अनुभवलेले आहे ,सर्वसामान्यांचा काम करणारे ,कार्यकर्ते ,अडचण घेऊन आलेल्या व्यक्तीला भेटणारे आता ही व्यक्ती तशी असेल का ?मनात शंका होती.पण सांगायला अतिशय अभिमान वाटतो किंचिसा ही बदल नाही. मंत्री पद मिळाले गर्व नाही अजून ही तेच धनु भाऊ जे आधी सगळया महाराष्ट्रासाठी ,परळीच्या मतदारांनसाठी होते सगळ्यांचे धनंजय भाऊ मुंडे ते तेच होते पूर्वीसारखे." त्याचबरोबर यावेळी त्यांनी उपरोधिक टोला नाव न घेता आधीचे मुख्यमंत्री यांच्या पत्नीवर लगावला. "अशी माणसे खूप कमी असतात ,आपुकीने बोलणे,विचारपूस करणे मागच्या मंत्री साहेबांनच्या पत्नीला जमत नसे पण त्यातल्या राजश्री धनंजय मुंडे नाहीच" असा टोला अमृता फडणवीस यांना लगावला.

Updated : 20 Jan 2020 7:21 AM GMT
Next Story
Share it
Top