Home > रिपोर्ट > बारामतीत सुप्रिया सुळेंचाच विजय - प्रकाश आंबेडकर

बारामतीत सुप्रिया सुळेंचाच विजय - प्रकाश आंबेडकर

बारामतीत सुप्रिया सुळेंचाच विजय - प्रकाश आंबेडकर
X

'वातावरण मोदींविरोधात आहे मात्र, ज्या पद्धतीनं भाजपच्या नेत्यांकडून बारामती मतदारसंघात विजयाचे दावे केले जात आहेत, त्यातून असं वाटतं की ईव्हीएममध्ये छेडछाड करून तर हे दावे केले जात नाहीत ना,'

अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहा दिवसांपूर्वीच उपस्थित केली होती. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बारामतीत सुप्रिया सुळे यांचाच विजय होईल, अशी शक्यता वर्तवलीय.

शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात बऱ्यापैकी कामं केली आहेत. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा पराभव होईल असं वाटत नाही, असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय. शरद पवारांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्यानं बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल उत्सुकता निर्माण झालीय.

Updated : 7 May 2019 2:04 PM GMT
Next Story
Share it
Top