Home > रिपोर्ट > 'पिपाणीवाल्या' आजी वर्ल्ड कप आणणार!

'पिपाणीवाल्या' आजी वर्ल्ड कप आणणार!

पिपाणीवाल्या आजी वर्ल्ड कप आणणार!
X

क्रिकेटच्या चाहत्यांची जगात कमी नाही. पण, अवघे वय वर्ष ८७ आणि तरुणाईला लाजवेल, असा जोम आणि उत्साह असलेल्या आजीबाई आता सोशल मीडियावर तुफान ट्रेण्डिंगमध्ये आहेत. नुकत्याच झालेल्या भारत आणि बांग्लादेश दरम्यानच्या सामन्यात टीम इंडियाचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात उतरलेल्या ८७ वर्षीय चारूलता पटेल यांना भेटण्याचा मोह भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मालाही आवरला न्हवता. त्या आजीबाईंनी मैदानात वाजवलेली पिपाणी देशभर जगभर इतकी घुमली की उद्योगपती आनंद महिंद्राही यांनाही या आजीबाई भावल्या.

या आजीबाईंचे क्रिकेटबद्दलचे प्रेम आणि उत्साह बघून उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांना आता विश्वचषक सामन्याचे तिकीट देणार आहेत. आनंद महिंद्रांनी ट्विटरवर नमूद करताना, ‘मॅच केवळ त्यांच्यासाठी बघितली. माझ्या परंपरेनुसार मी मॅच बघणार नव्हतो. मात्र केवळ या महिलेला बघून मी मॅच बघणार आहे. त्या एखाद्या मॅच विजेत्या प्रमाणेच वाटत आहेत.’ आंनद महिंद्रांच्या या ट्विटवर एका युजर्सने विचारले की, तुम्ही पिपाणीवाल्या आजींचे तिकीट स्पॉन्सर करणार का, युजर्सच्या या प्रश्नावर त्यांनी देखील आनंदाने होकार दिला.

आजीबाईंचा परिचय काय?

८७ वर्षीय चारूलता पटेल क्रिकेटच्या खूप मोठ्या चाहत्या आहेत. अगदी १९८३चा पहिल्या वर्ल्ड कप कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पटकावला त्या क्षणाची मी साक्षीदार आहे, असेही त्या सांगतात. २०१९चा विश्वचषकही भारतच पटकावेल, यात शंका नाही, असा विश्वास चारूलता यांना आहे.

Updated : 4 July 2019 12:06 PM GMT
Next Story
Share it
Top