Home > रिपोर्ट > पंकजा मुंडेचा दुष्काळ दाैरा

पंकजा मुंडेचा दुष्काळ दाैरा

पंकजा मुंडेचा दुष्काळ दाैरा
X

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे बीड जिल्ह्यतील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी सुरूवात केली असून त्यांनी तांबा राजुरी, आवळवाडी, रायमोडा, खोकरमोहासह गावांसह चारा छावण्यांना भेटी दिल्या, त्यावेळी त्यांनी तेथील ग्रामस्थांनशी चर्चा केली. मराठवाड्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर दुष्काळी प्रश्नांवर औरंगाबाद मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. बैठकासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहीती पंकजा मुंडे यांनी दिली आहेत.

यंदा पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने दुष्काळी परिस्थिती पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करून मदत करण्याची भुमिका घेतली आहे. त्याचबरोबर पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आता सरकारने 32 हजार कोटींचा वॉटरग्रीड प्रकल्प तयार केला असून पुढील सात वर्षात पाईपमधून शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी योजना आहे. पाऊस कमी पडला तरी दुष्काळी परिस्थिती जाणवणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Updated : 11 May 2019 8:25 AM GMT
Next Story
Share it
Top