Home > रिपोर्ट > देशाला चौकीदार पंतप्रधान नको

देशाला चौकीदार पंतप्रधान नको

देशाला चौकीदार पंतप्रधान नको
X

एकीकडे ममता बॅनर्जी मोदींवर ताशेरे ओढताना दिसत आहे तर दुरीकडे बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती म्हणाल्या देशाला दुहेरी व्यक्तिमत्व असणारा पंतप्रधान नको. देशाला पूर्णपणे समर्पित करून घेतलेला पंतप्रधान हवा. चायवाला किंवा चौकीदार नको, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खडसावले.

सर्व नेते सोशल मिडीयाचा वापर करताना दिसत असून यामध्ये बसपाच्या उमेदवारांनी कधीही सोशल मिडीयाचा वापर केला नाही पण यंदा मायावतींना सोशल मिडीयाचा वापर करून अनेकांवर टीका, आरोप, प्रत्यारोप केलं आहे. देशाने आतापर्यंत सेवक, मुख्य सेवक, चायवाला आणि चौकीदार पाहिला. ज्यांनी जनतेला नेहमीच दिशाहीन करण्याचे काम केले. पण आता देशाला केवळ पंतप्रधानाची आवश्यकता आहे, जो देशाच्या विकासाचा विचार करेल असेही त्या म्हणाल्या. लखनौमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. दरम्यान, मोदींची साथ संघानेही सोडल्याचा आरोप मायावतीनी पत्रकार परिषदेनंतर ट्विटरवरून केली. मोदींची लाट आता दिसत नाही त्यांचे राजकारण आता संपुष्टात आल्याचेही त्या म्हणाल्या.

Updated : 15 May 2019 4:58 AM GMT
Next Story
Share it
Top