Home > रिपोर्ट > कोणत्या पक्षाकडून किती महिला उमेदवार

कोणत्या पक्षाकडून किती महिला उमेदवार

कोणत्या पक्षाकडून किती महिला उमेदवार
X

डॉ. प्रीतम मुंडे :

बीडमध्ये डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बजरंग सोनावणे यांचा एक लाख ६८ हजार ३६८ मताधिक्याने पराभव केला. मुंडे बहीण-भावाची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या लोकसभा निवडणुकीत अखेर भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा पराभव केला.

सुप्रिया सुळे :

बारामती मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि बारामतीचे विद्यमान खासदार आहेत. सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभेत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. याआधी २०१४ मध्ये सुमारे ६९ हजार मतांनी सुप्रिया सुळेंचा विजय मिळवला होता. यावेळी बारामती लोकसभेसाठी ६१.५४ टक्के मतदान झाले. यावेळी ७० टक्क्य़ांहून अधिक मतदान बारामतीत झाले आहे. यामध्ये सुप्रिया सुळेंना यांना ६ लाख ८३ हजार ७०५ मते मिळाली तर कुल यांना ५ लाख २८ हजार ७११ मते मिळाली. 2006 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्याचवेळी त्यांनी निवडणूक लढवून २००९ ला भाजपच्या कांता नलवाडे यांना हरवले. २३ डिसेंबर २००९ ला त्या महिला विकास समितिच्या सदस्य झाल्या.

कांचन कुल :

भाजपाने बारामती मतदारसंघातून कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. पहिल्यांदा त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर कांचन कुल यांचे पती राहुल कुल हे २०१४ साली आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. कुल कुटुंबीयांचा दौंड, भोर, इंदापूर तालुक्यात प्रभाव आहे. कांचन कुल या कुल कुटुंबीयांच्या सून असून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावातील आहेत. त्यांचं शिक्षण बी ए हिंदी , शारदानगर महाविद्यालयातून झालेलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या त्या नातेवाईक आहेत.

ऊर्मिला मातोंडकर :

ऊर्मिला मातोंडकर या चित्रपट अभिनेत्री आहेत. २०१९ मध्ये त्यांनी राजकीय प्रवेश काँग्रेस पार्टी मधून केले. २०१९ मध्ये मुंबई- उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत 4 लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून भाजपचे खासदार गोपाळ शेट्टीसारखे कडवे आव्हान होते. मात्र या लढतीत त्यांचा पराभव झाला.

https://youtu.be/xfXJ-YIkhCA

पूनम महाजन :

मुंबईतील उत्तर-मध्य मुंबई या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन आणि काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांच्यात थेट लढत झाली. या चुरशीच्या लढतीत प्रिया दत्त गेल्यावेळच्या लढतीत प्रभाव झाला. उत्तर-मध्य मुंबईमधून पूनम महाजन यांनी एक लाख ३० हजारांहून अधिक मतांची सरशी घेत प्रिया दत्त यांचा पुन्हा एकदा पराभव केला.

नवनीत राणा :

अमरावतीमध्ये निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून लढत देणाऱ्या नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. मात्र गेल्या निवडणूकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार व युवा स्वाभिमानी पक्षाच्या नेत्या नवनीत कौर राणा यांच्यात थेट लढत झाली होती. या लढतीत त्यांचा विजय झाला आहे.

डॉ. हिना गावित :

डॉ. हिना गावित याआधी २०१४ ची निवडणूक विजयी झाल्या होत्या. नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ़ हिना गावित यांनी ७८ हजारांहून अधिक मतांनी निवडणून आल्या . नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. हिना गावित या लढतीत विजयी झाल्या.

Updated : 24 May 2019 6:45 PM IST
Next Story
Share it
Top