Home > रिपोर्ट > इंदिरा गांधी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा 'अर्थ'

इंदिरा गांधी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा 'अर्थ'

इंदिरा गांधी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा अर्थ
X

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं पहिलं बजेट 5 जुलै रोजी सादर करणार आहेत. महिला अर्थमंत्री म्हणून अशी कामगिरी करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. याआधी इंदिरा गांधी यांनी 28 फेब्रुवारी 1970 मध्ये देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता.

हा अर्थसंकल्पा इंदिरा गांधी यांनी दोन विभागात मांडला होता. पहिल्यात 17 तर दुसऱ्यात 38 मुद्दे होते. आपल्या 15 पानांच्या अर्थसंकल्पात इंदिरा गांधी यांनी मांडलेल्या तरतुदींपैकी 10 महत्वाचे मुद्दे

1. सिगारेटवरचा टॅक्स 3 वरुन 22 टक्के केला. त्यामुळं 10 सिगारेटच्या पाकीटाची किंमत 2 पैशांनी वाढली. इंदिरा गांधी यांनी काढलेल्या अंदाजानुसार या निर्णयामुळं देशाच्या तिजोरीत अतिरीक्त 13.50 कोटींचा महसूल मिळणार होता.

2. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 40 हजार करण्यात आली. आयकराच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न 3587 कोटींवरुन वाढून 3867 कोटींवर जाईल असा अंदाज होता.

3. भेटवस्तूंवरच्या कराची मर्यादा निम्म्यावर आणली. ही मर्यादा आधी 10,000 होती. या निर्णयानंतर ती 5,000 झाली. त्यामुळं 5,000 रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या भेटवस्तू कराच्या कक्षेत आल्या.

4. इंदिरा गांधी यांनी या अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये सरकारी अनुदानाची मोठी घोषणा केली. त्यानुसार या निधीत खातेदार, संस्था यासोबतच सरकारचंही 8 टक्क्यांचं अनुदान जाहीर केलं.

5. याशिवाय इंदिरा गांधी यांनी या अर्थसंकल्पात ‘अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेश’नच्या स्थापनेची घोषणा केली. त्यासाठी अर्थसंकल्पात 10 कोटींची तरतुदही करण्यात आली. शहरातल्या वस्त्यांमध्ये सोयीसुविधा पुरवणं, झोपडपट्टी पुनर्निमाण करणं हा याचा मूळ उद्देश होता.

6. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनामध्ये 40 रुपये महिना वाढ करण्यात आली. ही वाढ निर्णयाआधी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही लागू होती.

7. केंद्र सरकारच्या योजनांसाठी 15 टक्के वाढीव निधीची तरतूद करण्यात आली. 1969-70 मध्ये हा निधी 1223 कोटी इतका होता. तो इंदिरा गांधी यांनी 1970-71 या वर्षासाठी 1411 कोटी केला. कृषी क्षेत्राशी संबंधित योजनांसाठी अतिरीक्त 39 कोटींची तरतूद केली गेली. परिवहन विभागासाठी 84 कोटी, ऊर्जा 31 कोटी, कुटुंब कल्याण आणि सामाजिक कार्यांसाठी 28 कोटींची तरतूद केली गेली.

Updated : 4 July 2019 11:21 AM GMT
Next Story
Share it
Top