Home > Max Woman Blog > महिला दिनाच्या "आगाऊ" शुभेच्छा!

महिला दिनाच्या "आगाऊ" शुभेच्छा!

महिला दिनाच्या आगाऊ शुभेच्छा!
X

१) फेमिनिझमला फक्त दारू, कपडे, अफेअर्स एवढ्याच संकुचित अर्थाने पाहणाऱ्या मॉडर्न फेमिनिस्टांना

२) गरीब, अडाणी, कष्टकरी बायकांवरच्या प्रत्येक अत्याचाराला "लो क्लास लोकांची भांडणे" म्हणून दुर्लक्ष करणाऱ्या उच्चभ्रू फेमिनिस्टांना

३) दलित, आदिवासी स्त्रियांवरच्या प्रत्येक अन्यायाला ढुंकूनही न पाहणाऱ्या उच्चवर्णीय फेमिनिस्टांना

४) सेलेब्रिटी बायकांचे घरगुती झगडे टॉप प्रायोरिटी म्हणून पाहत, सामान्य बायकांच्या केसेस कचऱ्यात टाकणाऱ्या "पेज थ्री" महिला आयोगांना

५) विमानात दुसऱ्या प्रवाशाचा झोपेत पाय लागल्याने विनयभंग होणाऱ्या सेलिब्रिटी बायकांना

६) "राखीका इंसाफ" दाखवणाऱ्या चॅनेलवाल्याना आणि त्यावर भरभरून बोलणाऱ्या पत्रकारांना

७) "Who is this Savitri Phule?" म्हणत इंटरनेटवर महिला हक्कांच्या online petition साइन करणाऱ्या स्वातंत्र्यदेवींना

८) स्वतःशी वैचारिक मतभेद असणाऱ्या प्रत्येक पुरुषाला उगीचच Misogynist किंवा Male Chauvinist चे लेबल लावणाऱ्या महनीय स्त्रियांना

आणि सर्वात महत्वाचे ..

९) या सगळ्यात आपण किती broad minded आणि forward आहोत हे जगाला दाखवण्यासाठी वरील ८ आणि तत्सम प्रकारच्या असंख्य गोष्टींना रेटून पाठिंबा देणाऱ्या पुरुष मंडळींना विशेष शुभेच्छा!

आपणा सर्वांना उद्याच्या दिवसाच्या आजच "आगाऊ" शुभेच्छा!

सुखी रहा! आनंदी रहा!

(टीप: फेमिनिझम वर मला भाषण द्यायला येऊ नये. मी हा विषय खूप जास्त अनुभवला आणि अभ्यासला आहे. पोस्ट 2 वर्ष जुनी आहे, त्यामुळे अभ्यास अजून वाढलाय)

- डॉ. विनय काटे

Updated : 7 March 2020 4:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top