Home > Max Woman Blog > मर्यादा फक्त स्त्रियांना का?

मर्यादा फक्त स्त्रियांना का?

मर्यादा फक्त स्त्रियांना का?
X

दुसऱ्या महिलांचा लटकच आदर करायचा आणि घरातल्या महिलांची कदर नाही करायची दुसर्या बायांजवळ झोपायचं अन आपल्या बायाजवळ कोणी झोपु नये म्हणून पहारा द्यायचा कवर पळवाटा काढाव्यात? स्त्रियांना फेसबुक अकाउंट नको ,असलं तरी डिपी नको डीपी असला तरी घरंदाज पोस्टी टाकायच्या, जवळच्या च मित्रांची रिक्वेस्ट घ्यायची थोडक्यात व्यक्त होण्यासाठी बंधने टाकायची स्वतःचा जोडीदार निवडु नाही द्यायचा.अंतरजातीय लग्न करु द्यायचे नाही, लैंगिक सुख उपभोगु द्यायचे नाही आयुष्य भर तिची इच्छा नसली तरी बलात्कार करत रहायचा ,तिचा एखादा मित्र सहन नाही करायचा,रस्त्यावर तिन ढुंगण उघडं करून हागणं चालत पण ग्रामसभेत बोललेलं नाही जमत,स्त्री ने बदलू नये अन बाई म्हणूनच रहावं यासाठी किती हा दांभिकपणा असावा अरे बाईनं कसं रहावं तिने कराटे शिकावेत तिच्याकडे पिस्टल,चटणी असावी असं म्हणतात पण घरातील पुरुषांनी कसं वागायला पाहीजेत पोरांनी आता बदललं पाहीजे कधी सांगणार आहोत आपण?

भेदभाव विषमता या गोष्टी जर नष्ट करायच्या असतील तर न्याय समता धर्मनिरपेक्षता लोकशाही आणि इतर संविधानातील घटनात्मक मुल्यांनीच मिळणार आहेत यासाठी गरज आहे आता #पुरुषांनी_बदलण्याची_दोपाडगीपणा_सोडण्याची

Updated : 7 Dec 2019 6:15 AM GMT
Next Story
Share it
Top