लय भारी; कोरोनावरील लसीची किंमत ठरली !
X
संपूर्ण जग कोरोनावरील लसीची प्रतीक्षा करत असताना आता एक चांगली बातमी आली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने तयार झालेल्या Covishield या लसीची मानवी चाचणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आता सिरम इन्स्टिट्यूटने बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनशी करार केला असल्याचे शुक्रवारी जाहीर केले आहे. याअंतर्गत भारतासारख्या कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अवघ्या 3 डॉलर म्हणजेच 225 रुपयांना ही लस मिळणार आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने यासाठी 150 मिलियन डॉलरची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सध्या जगभरात कोरोनावरील 200 लसींवर काम सुरू आहे. यापैकी जवळपास 21 लसींची मानवी चाचणी सुरू आहे. कोवीशिल्ड ही त्यातील एक लस आहे. भारतात सिरम इन्स्टिट्यूट या लसीची निर्मिती करणार आहे. सिरम इन्स्टिट्यूचने 10 कोटी लसींच्या निर्मितीचे ध्येय ठेवले आहे.