एका वर्षात ८ लाख २४ हजार बालकांचा मृत्यू, केंद्र सरकार समोर मोठं आव्हान
X
देशातील कुपोषणावर मात करता यावी, बालमृत्यु संखेत घट व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने 2018 पासून सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून जाहिर केला. पण ‘लेव्हल्स अँड ट्रेंडस इन चाइल्ड मोरटॅलिटी रिपोर्ट २०२०’ (Levels and Trends in Child Mortality) च्या अहवालातून केंद्र सरकारच्या या मुळ उद्देशावरच पाणी फिरल्याचे दिसते.
लेव्हल्स अँड ट्रेंडस इन चाइल्ड मोरटॅलिटी च्या अहवाला नुसार जगातील पाच वर्षांखालील मुलांचे एक तृतीयांश मृत्यू हे भारतात होत असल्याचं समोर आलं आहे. भारतात २०१९ मध्ये पाच वर्षांखालील मुलांच्या दर हजारी मृत्यूत मुलांचे प्रमाण ३४ तर मुलींचे ३५ असे होते. तर मागील वर्षातील एकूण बाल मृत्युंची संख्या ही ६ लाख ७९ हजार इतकी आहे.
त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पोषण सबंधी कार्यक्रमांसाठी अर्थसंकल्पात 35,600 कोटी रुपयांची तरतूद करुनही ही संकल्पना फेल गेली आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.