Home > पर्सनॅलिटी > देवेंद्र भुजबळ यांना कोविड योद्धा सन्मान

देवेंद्र भुजबळ यांना कोविड योद्धा सन्मान

देवेंद्र भुजबळ यांना कोविड योद्धा सन्मान
X

कोरोनामुळे सगळं जग हादरले आहे. कोरोनाला नेस्तनाबूत करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत. भारतात २४ मार्च २०२० पासून लॉक डाऊन सुरू आहे. कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पण लॉक डाऊन सुरू होण्याच्या आधीपासूनच कोरोना: राजमुकुट नव्हे तर मृत्यू मुकुट हा कोरोना विषयीचा पहिला लेख लिहून गेले ३ महिने देवेंद्र भुजबळ कोरोना विषयक सातत्याने जन जागरण करत आहेत. विविध आय ए एस ,आय पी एस अधिकारी,डॉक्टर, समुपदेशक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मुलाखती, लेखन, अनेकांना प्रोत्साहन देऊन, लिहिते करून त्यांच्या लेखनाचे संपादन, प्रसिद्धी, माहितीपट निर्मिती, फेसबुक लाईव्ह, विविध वेब पोर्टल, वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्यांच्याद्वारे ते सतत सक्रिय आहेत. याबद्दल त्यांना भारतीय महाक्रांती सेना या संस्थेच्या वतीने कोविड योध्दा हा सन्मान नुकताच जाहीर करण्यात आला आहे.या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अल्प परिचय

देवेंद्र भुजबळ यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. आर्थिक दृष्ट्या आकर्षक असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून त्यांनी विचारपूर्वक माध्यम क्षेत्र निवडले. पत्रकार, दूरदर्शन निर्माता, माहिती खात्यात अधिकारी म्हणून गेली ३५ वर्षे ते प्रसार माध्यमात सक्रिय आहेत. दूरदर्शनच्या गाजलेल्या महाचर्चा कार्यक्रमाचे ४ वर्षे रिसर्च अँड रिसोर्स पर्सन तर आकाशवाणी वरील दिलखुलास कार्यक्रमाच्या पहिल्या ५०० भागांचे ते टीमलीडर होते.

स्वत:च्या करिअरमध्ये अनेकदा ठेचकळल्याने मुलांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज ओळखून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज वेबपोर्टलसाठी करिअर नामा हे सदर सुरू केले . या सदरासाठी ते स्वतःनियमित लेखन करीत. हे लेख विविध वृत्तपत्रातूनही प्रसिद्ध होत. पुढे त्याचेच फलित म्हणजे २५० सरकारी अभ्यासक्रम, प्रशिक्षण यांची माहिती असलेले "करिअरच्या नव्या दिशा" हे त्यांचे पुस्तक होय.या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या मुली,महिलांवर त्यांनी लिहिलेल्या प्रेरणादायी कथा गगनभरारी या पुस्तकात तर युवा आणि पुरुषांच्या प्रेरणादायी कथा प्रेरणेचे प्रवासी" या पुस्तकात समाविष्ट आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात त्यांचे "स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता" या विषयावर झालेले व्याख्यान विशेष गाजले. पुढे याच नावाने त्यांचे मराठी व इंग्रजी भाषेत पुस्तक प्रकाशित झाले. मलेशियातील चौथ्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. थायलंड,नेपाळ,रशिया, आर्मेनिया, अझरबईझाण या देशांबरोबरच भारतात, महाराष्ट्रात त्यांची विविध ठिकाणी संवाद सत्रे झाली आहेत, होत असतात. विविध विषयांवर ते सातत्याने लिहीत असतात.

"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता " हा त्यांचा संशोधन पर लेख मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी, गुजराती, ऊर्दू भाषेतही प्रसिद्ध झाला आहे. साहित्यिक, सामाजिक,सांस्कृतिक नाट्य, चित्रपट, दूरदर्शन, प्रसार माध्यमे यात कार्यरत राहण्यासाठी देवेंद्र भुजबळ सतत प्रयत्नशील असतात. समाजातील दुर्बळ घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थासमवेत त्यांचा घनिष्ठ संबंध आहे.

देवेंद्र भुजबळ

संपर्क क्रमांक:+91 9869484800.

इमेल: devendrabhujbal4760@gmail.com

Updated : 4 Jun 2020 1:48 PM GMT
Next Story
Share it
Top