Home > बिझनेस > #AatmanirbharBharat : MSME क्षेत्राला तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज- निर्मला सीतारमण

#AatmanirbharBharat : MSME क्षेत्राला तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज- निर्मला सीतारमण

#AatmanirbharBharat : MSME क्षेत्राला तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज- निर्मला सीतारमण
X

MSME सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. MSME साठी आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 3 लाख कोटी रुपये पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेज अंतर्गत बिना गॅरंटी कर्ज दिलं जाणार आहे. यासाठी 4 वर्षाची मुदत असणार आहे. ही योजना 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत असेल तसंच या पॅकेजमुळे 45 लाख MSME उद्योगांना फायदा होईल. 1 वर्ष या कर्जाचा हप्ता भरण्याची गरज नसेल. अशी माहिती निर्मसा सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी दिली आहे.

जे एमएसएमई उद्योग कोरोना व्हायरस मुळे संकटात आले आहेत. त्यांना त्यांचा व्यवसाय़ वाढवण्यासाठी 10,000 कोटी निधीची मदत केली जाईल. असं देखील निर्मला सीतारमण यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं आहे

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. त्या पॅकेज संदर्भात माहिती दिली आहे.

Updated : 13 May 2020 5:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top